Saturday, June 13, 2015

बाबासाहेब!आपल्या सामाजिक चळवळी चा (सामाजिक आंदोलन) काय परिणाम झाला आहे ?

Kavita Tayade
June 13 at 1:24am
 
पत्रकार: बाबासाहेब, आपण, सुख आणि दुःख, मान आणि अपमान, अनंत अडचणीची पर्वा न करता दाबलेल्या (दबाये गये -Depressed Classes -अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, व्ही.जे, एन.टी) लोकांच्या प्रगतीसाठी आपले संपूर्ण जीवन आयुष्याची चाळीस वर्ष (1916- 56) सामाजिक चळवळीत घालविले. 
आपली चार मुले वेळेवर ओषधोपचार न मिळाल्यामुळे मरण पावली, तरीही आपण ह्या प्रचंड कौटुंबिक दुःखाला न डळमळता, धीर न सोडता आपले सामाजिक आंदोलन पुढे पुढे आपण ठरवलेत्या उदिष्टा कडे नेत गेलात. 
आपल्या सामाजिक चळवळी चा (सामाजिक आंदोलन) काय परिणाम झाला आहे ? 

बाबासाहेब: अमानवीय समाज व्यवस्थे मुळे हा माझा समाज अपमान आणि गुलामगिरी च्या मृतपाय अवस्थेत जगत होता. 
ह्या माझ्या समाजात मी स्वाभिमान जागविला , माझ्या समाजात मी ही जी स्वाभिमानाची ज्योत पेटवली आहे, 
मला आशा आहे, मी ही जी स्वाभिमानाची ज्योत पेटवली आहे, ज्योतीने माझा समाज ह्या अमानुष सामाजिक व्यवस्थे ला जाळुन राख केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही व ह्या असमानता, गुलामगिरी , अन्याय च्या अमानवीय समाज व्यवस्थे मधुन स्वतंत्र होतील. 
हे माझे भाकित माझे लोक खोट ठरू देणार नाही, असा मला माझ्या लोकावर पुर्ण विश्वास आहे.

No comments:

Post a Comment